Shreya Maskar
शाही तुकडा बनवण्यासाठी ब्रेड, फुल-क्रीम दूध, साखर, तूप, वेलची पावडर, केशर, सुकामेवा, मावा , कंडेंस्ड मिल्क आणि गुलाबपाणी इत्यादी साहित्य लागते.
शाही तुकडा बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडच्या कडा कापून त्यांचे चौकोनी तुकडे करा. तुकडे जास्त छोटे किंवा मोठे करू नका.
पॅनमध्ये तूप गरम करून ब्रेडचे तुकडे मंद आचेवर गोल्डन फ्राय तळून घ्या. ब्रेड छान क्रिस्पी होऊ दे.
एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून सिरप तयार करा. यात थोडी वेलची पावडर आणि केशर घाला. यामुळे मिठाईला चांगला रंग आणि चव येते.
गरम ब्रेड साखरच्या सिरपमध्ये बुडवा. काही ५-१० मिनिटे ब्रेड तसाच ठेवून द्या.
दुसऱ्या पॅनमध्ये दूध उकळवा आणि ते अर्धे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर मिश्रणात मावा, कंडेंस्ड मिल्क घाला. पेस्ट थोडी घट्ट करा.
आता मिश्रणात कापलेले ड्रायफ्रूट्स आणि केशर घाला. शाही तुकडा ही मिठाई हैदराबादमध्ये स्पेशल आहे.
पाकातला ब्रेड एका बाऊलमध्ये काढून त्यावर गरम कंडेंस्ड मिल्कचे मिश्रण ओता. पुन्हा मिठाईवर ड्रायफ्रूट्स घाला आणि छान सजवा.