Manasvi Choudhary
वालाच्या शेंगांची भाजी खाण्याचे गुणकारी फायदे आहेत. वालाच्या शेंगांमध्ये जीवनसत्वे, तांबे, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने ही जीवनसत्वे असतात.
वालाच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट भरलेले राहते यामुळे वजन कमी होते.
मधुमेहाच्या व्यक्तींनी आहारात वालाच्या शेंगांची भाजी खाणे फायदेशीर ठरेल
वालाच्या शेंगांची भाजी घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. वालाच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी वालाच्या शेंगा, तेल, कांदा, लसूण, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
वालाच्या शेंगांचा रस्सा बनवण्यासाठी वालाच्या शेंगा सोलून त्याचे देठ काढून टाका. नतंर वालाच्या शेंगा मध्यम आकारात चिरून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण चांगले परतून घ्या. यानंतर या मिश्रणात वालाच्या सोललेल्या शेंगा आणि हळद, लाल मसाला मिक्स करा.
या मिश्रणात थोडेसे पाणी घालून मिश्रण शिजवण्यासाठी ठेवा नंतर यात चवीनुसार मीठ घाला शेंगांची भाजी शिजल्यानंतर तुम्ही यात थोडे शेंगदाणा कूट देखील टाकू शकता.
अशाप्रकारे वालाच्या शेंगांची रस्सा भाजी सर्व्हसाठी तयार होईल.
https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/boiled-egg-masala-fry-recipe-easty-to-make-at-home-msc01