ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षातून हकालपट्टी केलेल्या राजेंद्र हगवणेची सून होती. पुण्यातील भूकुम येथे १६ मे २०२५ रोजी २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली.
वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या लोकांनी पैशांसाठी वैष्णवीचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. तिला घराबाहेरही काढण्यात आलं.
लग्नामध्ये वैष्णवीच्या माहेरच्यांकडून हुंड्यामध्ये ५१ तोळं सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भाडी देण्यात आली होती.
वैष्णवी आणि शंशाकच्या लग्नासाठी वैष्णवीच्या म्हणजेच कस्पटे कुटुंबियांनी विरोध दर्शवला होता. परंतु वैष्णवीला शशांकशीच लग्न करायच होत. यासाठी तिच्या वडिलांची समजूत घालण्यात आली. असं वैष्णवीच्या मामाने सांगितले.
लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी, ५१ तोळं सोनं आणि चांदीची भांडी दिल्यांनतरही हगवणे कुटुंबियांची हाव संपली नाही. पैसे, हुंड्यासाठी तिचा वारंवार छळ केला, तिला मारहाण केली. असं वैष्णवीच्या मामाने सांगितले.
लग्नानाच्या बैठकीत मोठमोठ्या मागण्या होऊ लागल्यानं वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलगी देण्यास नकार दिला. MG हेक्टर गाडी नको ती रद्द करा, फॉर्च्युनर पाहिजे असं म्हणत हगवणे कुटुंबियांनी भांडून मोठी गाडी घेतली.
याच वादातून सोन्याची मागणी देखील करण्यात आली. याशिवाय १ लाख २० हजारांचं घड्याळही लग्नाच्या बैठकीत मागण्यातं आलं. सहा महिन्यातच अशा गोष्टी वाढू लागल्या.
या सर्व गोष्टींवर मामाने विचारलं, हा काय प्रकार आहे? मामा माझी चूक झाली असं वैष्णवीने मामाने सांगितले.