Siddhi Hande
मूळशीच्या वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली.
वैष्णवी हगवणेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचललं. वैष्णवीची हत्या केली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
वैष्णवी हगवणेच्या लग्नात तिच्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता.
वैष्णवीच्या लग्नात तिला ५१ तोळं सोनं, चांदी आणि फॉर्च्युनर गिफ्ट केली होती.
वैष्णवीच्या लग्नासाठी आकर्षक रोशनाई आणि मोठा मंडप घालण्यात आला होता.
वैष्णवीच्या लग्नासाठीच नव्हे तर तिच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी, संगीत सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.
वैष्णवीला ९ महिन्याचे बाळ आहे. वैष्णवीला झालेल्या त्रासाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैष्णवीच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा नवरा, सासू- सासरे, नणंद आणि दिराला अटक केली आहे.