Shreya Maskar
महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गड-किल्ले पाहायला मिळतात. यामध्ये आपला इतिहास लपलेला आहे. ज्याचे जतन आपण केले पाहिजे.
सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेला वैराटगड हा सुमारे ११ व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज याने बांधलेला ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे.
वैराटगड महाबळेश्वर डोंगररांगेत वसलेला आहे. शिवरायांनी तो आपल्या राज्यात समाविष्ट केला होता.
वैराटगड किल्ल्यावर मजबूत तटबंदीचे अवशेष, पाण्याची ५-६ नैसर्गिक टाकी, जुन्या इमारतींचे अवशेष आणि वरच्या बाजूला एक पुरातन हनुमान मंदिर आहे.
वैराटगड ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे मित्रांसोबत आताच येथे फिरायला जाण्याचा प्लान करा.
तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे जाऊ शिकता. हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण अनुभवता येईल. तसेच येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो काढा.
साताऱ्याला गेल्यावर कास पठार, सज्जनगड, अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, महाबळेश्वर-पाचगणी ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.