Shreya Maskar
हिवाळ्यात तुम्हाला पालेभाजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट सोयाबीनची भाजी बनवा. लहान मुलं देखील आवडीने खातील.
सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सोया चंक्स, बटाटे, मटार, दही, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, हिंग, जिरं, धणे पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी कुकरला बटाटे उकडून घ्या. पॅनमध्ये सोया चंक्स उकळून घ्या मग. त्यानंतर गाळून त्यातील पाणी काढून घ्या.
बाऊलमध्ये दही आणि सर्व मसाले मिक्स करा. उदा. धणे पावर, जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला मस्त एकजीव करा.
पॅनमध्ये तेल टाकून जिरे, हिंग, हिरवी मिरची, दहीचे मिश्रण, मटार, सोया चंक्स टाकून चांगले परतून घ्या.
थोड्या वेळाने यात उकडलेले बटाट्यांचे बारीक काप करून घाला. पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.
शेवटी यात कोथिंबीर, मीठ, बडीशेप पावडर घालून मिक्स करा. तुम्ही यात पुदिन्यातची पाने देखील टाकू शकता.
गरमागरम सोयाबीनची भाजीचा चपाती आणि भातासोबत आस्वाद घ्या. रेस्टॉरंटमध्ये देखील अशाप्रकारे भाजी बनवली जाते.