Shreya Maskar
रात्रीच्या जेवणाला चटपटीत आणि हेल्दी गावरान भाजी बनवा. हरभऱ्याच्या पानांची भाजी हा एक चांगला प्रकार आहे.
हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी हरभऱ्याच्या कोवळी पानं , तेल, मोहरी, जिरे, लसूण, हिंग, कांदा , हिरव्या मिरच्या, नारळ, शेंगदाणे आणि चवीपुरता मीठ इत्यादी साहित्य लागते.
हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभऱ्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर थोडी कोरडी करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून यात मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. त्यानंतर यात कांदा आणि लसूण घालून गोल्डन फ्राय करा.
गॅस मध्यम आचेवर ठेवून भाजी चांगली वाफवून घ्या. यात चवीनुसार मीठ घाला आणि साखरेचे दोन दाणे टाका.
शेवटी हरभऱ्याच्या पानांच्या भाजीत ओलं खोबरं घालून तिचा गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या. तुम्ही भात-डाळीसोबतही याचा आस्वाद घेऊ शकता.
हरभऱ्याच्या पानांची भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी यात मुगाची डाळ आणि बटाटे देखील घालू शकता. फक्त बटाटे उकडून टाका.
तुम्हाला लहान मुलांना ही भाजी आवडीने खाऊ घालायची असेल तर याच बारीक शेंगदाण्याचा कूट देखील घाला. जेणेकरून मुलांना चांगले पोषण मिळेल.