Shreya Maskar
आजकाल V Neck ब्लाउजचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हे ब्लाउज काठा पदराची साडी आणि वेस्टन साडी दोघांवरही खूपच शोभून दिसतात.
V Neck मध्ये आपली बॉडी सुबक दिसते. मान लांब वाटते. ज्यात ज्वेलरी शोभून दिसते. त्यामुळे जर तुम्हाला एखादा सुंदर नेकपीस घालायचा असेल तर V Neck ब्लाउज बेस्ट ऑप्शन आहे.
व्ही-नेक ब्लाउजचे अनेक प्रकार आहेत. उदा. डीप व्ही-नेक, ब्रॉड व्ही-नेक, लेस व्ही-नेक, कॉलर व्ही-नेक, डबल-लेयर्ड व्ही-नेक, मिरर वर्क व्ही-नेक, एम्बेलिश्ड व्ही-नेक
व्ही-नेक ब्लाउजसाठी काळा, पांढरा, मरून, नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन आणि रॉयल ब्लू हे रंग उत्तम आहेत, कारण ते अनेक साड्यांवर सूट होतात.
सिंपल साड्यांसाठी सिक्विन किंवा एम्ब्रॉयडरी असलेले कॉन्ट्रास्ट रंग आणि गडद रंगांच्या साड्यांसाठी पेस्टल किंवा न्यूट्रल रंगांचे ब्लाउज आकर्षक वाटतात.
ब्लाउजच्या दोन्ही बाजूंना V Neck सुंदर दिसतो. तुमच्या आवडीनुसार आणि लूकनुसार तुम्ही निवड करा. तुम्हाला उंच आणि बारीक दिसायचे असेल तर ब्रॉड V-नेक ब्लाउज पॅटर्न ट्राय करता येईल.
तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक करायचा असेल तर V Neck ब्लाउज आवर्जून ट्राय करा. साडीवर कॉलर V-नेक ब्लाउज चांगला शोभून दिसेल. यामुळे तुम्हाला एक बॉसी लूक येईल.
V Neck ब्लाउजवर तुम्ही लेस वर्क, मोती, झरी वर्क, मिरर वर्क करू शकता. यामुळे थोडा रॉयल लूक येईल. लग्न समारंभात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.