ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. परंतु तुम्हाला माहितीये का तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्याच्या इन्फेक्शनचा धोका वाढतो. कडाक्याच्या उन्हापासून डोळ्याचे रक्षण करण्यासाठी हे टिप्स नक्की फॉलो करा.
सूर्याच्या तीव्र यूवी किरणांमुळे डोळ्यांची नाजूक त्वचा आणि रेटिनाला नुकसान होऊ शकते.
सूर्याच्या यूवी किरणांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकतात.
यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
वाढत्या प्रदूषणसह, तसेच धूळीमुळे डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे आणि जळजळ होण्याची समस्या वाढते.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेसचा किंवा टोपीचा वापर करा.