Tiffin Recipe : रोज टिफिनला चपाती-भाजी खाऊन कंटाळा आला? मग झटपट बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

टिफिन रेसिपी

टिफिनसाठी झटपट उत्तप्पा बनवा. हा पदार्थ खाण्यासाठी हेल्दी आहे. तसेच फक्त ५-१० मिनिटांत तयार होतो.

Tiffin Recipe | yandex

उत्तप्पा

उत्तप्पा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ, मीठ, बेकिंग सोडा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण आणि हिरव्या मिरची इत्यादी साहित्य लागते.

Uttappa | yandex

गव्हाचं पीठ

उत्तपा बनवण्यासाठी बाऊलमध्ये गव्हाचं पीठ, मीठ, तिखट, बेकिंग सोडा टाकून घट्टसर पेस्ट तयार करून घ्या. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Wheat flour | yandex

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका. छान फोडणी तडतडू द्या.

Oil | yandex

फोडणी

तयार फोडणी गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात टाका आणि सर्व एकजीव करून घ्या. ज्यामुळे पदार्थाची चव आणखी वाढेल.

Uttappa | yandex

कोथिंबीर

पॅन गरम करून त्यात तेल टाकून गव्हाच्या पिठाचे मिश्रण चांगले पसरवून घ्या. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला.

Coriander | yandex

गोल्डन फ्राय

उत्तप्पा तेलात मस्त गोल्डन फ्राय करा. तुम्ही पॅनवर गव्हाच्या पिठाचे मिश्रण टाकण्यापूर्वी थोडे पाणी देखील शिंपडा. जेणेकरून पीठ पॅनला चिकटणार नाही.

Uttappa | yandex

पुदिना चटणी

तयार उत्तप्पा तुम्ही सॉस, पुदिना चटणी आणि नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Mint chutney | yandex

NEXT : कमी वेळात पोटाची ढेरी होईल गायब, रिकाम्या पोटी प्या 'हा' हेल्दी ज्यूज

Weight Loss | yandex
येथे क्लिक करा...