Shreya Maskar
आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश केला, तर तुम्हाला झटपट वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करा.
अननसाचा ज्यूस बनवण्यासाठी अननस, संत्री, डाळिंब, काकडी, ड्रायफ्रूट्स, तुळशीची पाने, कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते. सर्व फळ फ्रेश घ्या.
अननसाचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम अननस सोलून त्याचे तुकडे कापून घ्या. तुकड्यांमध्ये साल येणार नाही याची काळजी घ्या.
त्यानंतर संत्र्याची साल सोलून बिया काढून घ्या. तसेच डाळिंबचे दाणे देखील काढून घ्या. तुम्ही यात आवडीनुसार अजून फळे टाकू शकता.
आता संत्री , अननस आणि डाळिंबचे दाणे ज्यूसरमध्ये टाकून त्यांचा रस बनवा. रस जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
तयार ज्यूस एका मोठ्या भांड्यात काढून तुम्ही त्यात तुळशीची फ्रेश पाने टाकून मिक्स करा. तुळशीमुळे ज्यूसमधील पोषक घटक वाढतात.
अननसाच्या ज्यूसमध्ये तुम्ही कापलेले बदाम, काजू आणि पिस्ता देखील टाकू शकता. ड्रायफ्रूट्समुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
हेल्दी अननसाचा ज्यूस तुम्ही नियमित सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या. ज्यामुळे तुमचे महिन्याभरात वजन कमी होण्यास मदत होईल.