Uttapam Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उत्तपम; जाणून घ्या सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

2 कप इडली-डोसा पीठ, 1 कांदा (बारीक चिरलेला), 1 टोमॅटो (बारीक चिरलेला), 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), 2 चमचे कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल किंवा तूप

uttapam | yandex

भाज्यांची तयारी करा

कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. यामुळे उत्तपमला रंग, चव आणि पौष्टिकता मिळते.

Uttapam Recipe | GOOGLE

पीठ तयार ठेवा

इडली-डोसा पीठ एका भांड्यात घेऊन आवश्यक असल्यास थोडे मीठ घाला. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे.

Uttapam | Google

तवा गरम करा

नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर थोडे तेल लावून तवा तयार ठेवा.

Uttapam | Google

उत्तपम पसरवा

तव्यावर एक डाव पीठ घालून डोश्यापेक्षा थोडे जाडसर गोल आकारात पसरवा. त्यावर तयार केलेल्या भाज्या समान प्रमाणात पसरवा.

Uttapam | Google

दोन्ही बाजूंनी भाजून घ्या

उत्तपमच्या कडा आणि वरच्या बाजूला थोडे तेल किंवा तूप सोडा. झाकण ठेवून एक बाजू शिजू द्या. नंतर उलटून दुसरी बाजूही सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

Uttapam | google

गरमागरम सर्व्ह करा

तयार उत्तपम नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा. नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Uttapam | Saam Tv

Skin Care: चेहऱ्यावर रोज टॅल्कम पावडर लावता? मेकअप आर्टिस्ट म्हणतात यामुळे चेहऱ्याला होतात हे त्रास

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा