Shruti Vilas Kadam
टॅल्कम पावडरचा अतिवापर केल्याने त्वचेवरील छिद्रे (पोर्स) बंद होऊ शकतात. त्यामुळे त्वचेला योग्य प्रमाणात हवा मिळत नाही आणि पिंपल्स वाढू शकते.
पावडर त्वचेवरील नैसर्गिक तेल शोषून घेते. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खडबडीत होण्याचा धोका वाढतो.
विशेषतः तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींमध्ये टॅल्कम पावडर घाम, धूळ आणि तेलासोबत मिसळून मुरुमांची समस्या निर्माण करू शकते.
संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांमध्ये काही पावडरमधील सुगंधी घटक किंवा रसायने त्वचेची खाज, लालसरपणा आणि जळजळ निर्माण करू शकतात.
रोज पावडर लावल्याने त्वचेवर एक थर तयार होतो. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक आणि ताजेपणा कमी झाल्यासारखा वाटू शकतो.
काही लोकांना टॅल्कम पावडरमधील विशिष्ट घटकांमुळे अॅलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते. यामध्ये खाज, पुरळ किंवा त्वचा सोलणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
पावडरचे सूक्ष्म कण डोळ्यांत किंवा नाकावाटे श्वसनमार्गात गेल्यास चिडचिड, शिंक किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.