Shreya Maskar
अमेरिकेतील अलास्का इथल्या उटकिआगविक या ठिकाणी जवळपास दोन महिन्यांनंतर सूर्योदय पाहायला मिळतो.
थंडीच्या दिवसांत येथे सूर्यप्रकाश येत नाही.
उटकिआगविक हे शहर बॅरो या नावानेही ओळखलं जाते.
विज्ञानानुसार, आपली पृथ्वी अक्षातून 23.5 अंशांनी झुकलेली असल्यामुळे एका भागात सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही.
यामुळे काही काळासाठी उत्तर आणि दक्षिणेला असलेल्या भागांमध्ये सूर्यप्रकाश येत नाही.
सूर्यप्रकाश न येण्याचा काळ 24 तासांपासून ते दोन महिन्यांपर्यंत असू शकतो.
येथे सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.