Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात आरोग्यासह त्वचेची, ओठांची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात ओठ फाटणी ही समस्या सामान्य असली तरी त्रासदायक असते.
हिवाळ्यात ओठ फाटल्यानंतर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
शरीरात त्वचेवर तेल ग्रंथी असतात ज्यामुळे त्वचा मऊ राहते मात्र हिवाळ्यात त्वचा कोरडी होते ओठांवर या ग्रंथी नसतात त्यामुळे ते लवकर कोरडे होतात.
हिवाळ्यातील वातावरणाचा परिणाम ओठांवर होतो कोरड्या हवेमुळे ओठांमधील ओलावा कमी होतो.
अनेकांना ओठ कोरडे झाल्यावर त्यांना जीभेने चाटण्याची सवय असते यामुळे ओठांवरचा तेलकटपणा निघून जातो ओठ कोरडे होतात.
थंडीच्या दिवसात एसपीएफ असलेले लिप बाम वापरा तसेच ओठांना पेट्रोलियम जेली आणि लिप बाम लावा.
साखर आणि मध हे मिश्रण एकत्र करून ते हलक्या हाताने ओठांना लावा आणि मसाज करा यामुळे ओठांवरील त्रास कमी होईल.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर शुद्ध खोबरेल तेल किंवा घरगुती साजूक तूप लावा. हिवाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्या यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील.