Manasvi Choudhary
सकाळचा नाश्त्याला पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात यामुळे संपूर्ण दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. यासाठी आज आम्ही तुम्हाला पालकचे थालीपीठ कसं बनवायचे ही रेसिपी सांगणार आहोत.
पालकचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. पालकचे थालीपीठ तुम्ही सहज अगदी घरच्या घरी बनवू शकता.
पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, पालक, कांदा, जिरे, ओवा, हळद, मीठ, तेल किंवा तूप हे साहित्य घ्या.
पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्या बारीक चिरून घ्या. मिक्सरमध्ये तुम्ही पालकची बारीक पेस्ट देखील करू शकता.
त्यानंतर एका भांड्यात ज्वारीचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, जिरे, ओवा आणि बारीक चिरलेला कांदा हे मिश्रण एकत्र करा.
या संपूर्ण मिश्रणात तयार पालकची पेस्ट मिक्स करा यामध्ये गरजेनुसार थोडेसे पाणी मिक्स करा आणि कणिक मळून घ्या
थालीपीठ थापण्यासाठी केळीचे पान किंवा बटर पेपर घ्या पिठाचा एक गोळा घेऊन हाताला पाणी लावून थालीपीठ थापून घ्या.
थालीपीठच्या मधोमध दोन ते तीन छिद्रे पाडा यानंतर गॅसवर गरम तव्यावर तेल किंवा तूप लावून थालीपीठ चांगले भाजून घ्या. अशाप्रकारे गरमा गरम थालीपीठ सर्व्हसाठी तयार होईल.