ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या डिजिटल युगत स्मार्टफोन आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासूनत ते झोपेपर्यंत आपण फोनचा वापर करतो.
काही लोकांना टॉयलेटमध्ये देखील फोन वापरण्याची सवय असते. परंतु, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
जर तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जात असाल तर टॉयलेटमधील बॅक्टेरिया तुमच्या फोनला चिकटतात. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
जेव्हा आपण फोन टॉयलेटमध्ये घेऊन जातो तेव्हा तासनतास तिथेच बसतो यामुळे पेल्विक स्नायूंवर ताण येतो.
टॉयलेटमध्ये फोन वापरताना आपल्या मेंदूला नवनवीन माहिती मिळत असते यामुले मेंदूला विश्रांती मिळत नाही. याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
टॉयलेटमध्ये फोनचा वापर करताना एकाच स्थितीत बसल्याने अनावश्यक दबाव येतो, ज्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
शौचालयात जास्त वेळ फोन वापरल्याने लघवीचा संसर्ग होऊ शकतो.