Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिला जागतिक बुद्धिबळ वर्ल्डकप

जॉर्जिया येथे झालेल्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने ३८ वर्षीय कोनेरू हम्पीचा पराभव करत महिला जागतिक बुद्धिबळ वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले.

Divya deshmukh | Divya deshmukh/instagram

मराठमोळी दिव्या देशमुख

दिव्या ही नागपूरची राहणारी आहे. तिची बहीण बॅडमिंटन खेळायची तेव्हा ती बहिणासोबत जायची. तिथे तिला बुद्धिबळात रस निर्माण झाला. दिव्याने २०१२ मध्ये ७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकून राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली.

Divya deshmukh | Divya deshmukh/instagram

आई- वडिल

दिव्या देशमुखचे आई-वडील डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख दोघेही डॉक्टर आहेत.

Divya deshmukh

चॅम्पियन

दिव्याने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर जिंकले तर २०२४ मध्ये वर्ल्ड ज्यूनियर गर्ल्स U- 20 चॅम्पियसह नंबर १ खेळाडू बनली. दिव्याने २०१४ मध्ये दक्षिणअफ्रिका येथील डरबनमध्ये Under-10 आणि २०१७ मध्ये ब्राजीलमधील १२ वर्षाखालील जागतिक युवा जेतेपद जिंकले.

Divya deshmukh

ग्रँडमास्टर

२०२१ मध्ये दिव्या महिला ग्रँडमास्टर बनली तसेच विदर्भातील पहिली महिला ग्रँडमास्टर होण्याचा इतिहास रचला.

Divya deshmukh

ग्रँडमास्टर आरबी रमेश

चेन्नईतील बुद्धिबळ गुरुकुलमध्ये ग्रँडमास्टर आरबी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याने तिच्या कौशल्यावर आणखी काम केले.

Divya deshmukh

दिव्याची सुवर्ण कामगिरी

दिव्याने ऑलिंपियाडमध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले. आशियाई चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे.

Divya deshmukh | google

चौथी भारतीय खेळाडू

दिव्या देशमुख ही ग्रँडमास्टर होणारी चौथी भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या आधी कोनेरू हम्पी, आर वैशाली आणि हरी द्रोणवल्ली यांनी ग्रँडमास्टरचे विजेतेपद पटकावले आहे.

divya deshmukh | google

NEXT: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

walking | yandex
येथे क्लिक करा