ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या अनहेल्दी लाईफस्टाइल आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयींमुळे, अनेकांना निद्रानाशाचा म्हणजेच झोप न येण्याची समस्या होते. यामुळे इतर शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात.
आज आम्ही तुम्हाला काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमची झोप खराब करू शकतात, जाणून घ्या.
झोपण्याआधी मन शांत करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या किंवा कुटुंबाच्या ताणतणावाकडे दुर्लक्ष करा. यामुळे तुमची झोप बिघडू शकते.
काही लोकांना रात्रीच्या वेळी मसालेदार अन्न खाणे आवडते. परंतु. मसालेदार अन्न पचण्यास वेळ लागतो आणि त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते.
जर तुम्ही रात्री चहा किंवा कॉफी पीत असाल तर आजच टाळा. त्यात कॅफिन असते आणि कॅफिनमुळे झोप येण्यास अडथळा निर्माण होतो.
व्यायाम हा नेहमीच शरीरासाठी फायदेशीर राहिला आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी न केल्याने देखील झोप येण्यास अडथळा येतो. म्हणून झोपण्याआधी व्यायाम केल्याने चांगली झोप येते.
रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने त्यातून निघणारा निळा प्रकाश तुमच्या झोपेच्या सायकलमध्ये व्यत्यय आणतो. म्हणून झोपण्याच्या एक तास आधी फोनचा वापर बंद करा.