Surabhi Jayashree Jagdish
आजकाल जेवताना मोबाईल वापरणे ही अनेकांची सवय झाली आहे. पण यामुळे जेवणावरून लक्ष हटते आणि आपण काय खातोय याकडे दुर्लक्ष होते. ही सवय हळूहळू आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, जेवताना मोबाईल वापरल्याने ब्लड शुगर वाढू शकतो. कारण आपण अन्नाची निवड आणि प्रमाण याकडे योग्य लक्ष देत नाही. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.
मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे आपण पोषक अन्नाकडे दुर्लक्ष करतो. त्याऐवजी प्रोसेस्ड किंवा कमी पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. याचा थेट परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो.
वारंवार चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने ब्लड शुगर वाढत राहतो. यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स होण्याचा धोका वाढतो. दीर्घकाळात यामुळे मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मोबाईलमुळे आपण शरीराच्या भुकेच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण कधी पोट भरलं हे लक्षात येत नाही. यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं होतं.
अशा प्रकारे जास्त खाल्ल्याने ओव्हरईटिंगची सवय लागते. ही सवय वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण ठरतं. वजन वाढल्याने इतर आरोग्य समस्याही वाढू शकतात
म्हणून जेवताना पूर्ण लक्ष अन्नावर असणं खूप गरजेचं आहे. आपण काय खातो, किती खातो आणि कधी पोट भरतं याची जाणीव ठेवावी. सजगपणे जेवणे हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.