ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक संसर्गाचे आजार पसरतात.
त्यामध्ये जर तुम्हाला सर्दी, खोकला झाला तर त्याचा परिणाम तुमच्या कानांवर होतो.
पावसाळ्यात अनेकदा कान दुखल्यावर त्यामध्ये औषध घातलं जातं किंवा घरगुती उपाय केले जातात.
परंतु, कानामध्ये वापरलं जाणारे औषध तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
कानाचं औषध वापरल्यामुळे तुम्हाला कानामध्ये खाज, वेदना किंवा ठणका बसू शकतो.
कानाचं औषध वापरल्यामुळे कानामध्ये बॅक्टिरियांची वाढ होते आणि त्यामुळे अनेकदा पू निर्माण होतो.
अनेकजण घरामध्ये घरगुती उपाय म्हणून कानामध्ये तेल घालतात ज्यामुळे कानामध्ये अधिक वेदना होऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.