ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खराब जीवनशैली, खाण्यापिण्याचया चुकीच्या सवयी आणि वाढत्या प्रदूषणांमुळे केसाशी संबधित समस्या वाढत आहेत.
आवळा औषधीय गुणधर्माने भरपूर आहे. हे केसाच्या वाढीसाठी तसेच अनेक समस्यावर रामबाण उपाय आहे.
केसांना आवळा लावण्याचे भरपूर फायदे आहेत. परंतु आवळ्याचा केसासाठी कसा उपयोग करायचा हे जाणून घ्या.
आवळा स्कॅल्पवर लावल्याने केसातील घाण साफ होऊन खाज आणि जळजळ सारख्या समस्येपासून आराम मिळतो.
४० तुळशीची पाने आणि दोन चमचे आवळ्याची पावडर मिक्स करा. आणि स्कॅल्पवर लावा. सुकल्यानंतर केस धुवा.
अर्धा कप पाण्यात आवळ्याची पावडर आणि मेंहदी मिक्स करा. गरजेनुसार पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा.
तयार केलेली ही पेस्ट केसांना लावा आणि १५ मिनिटांनी हे केस धुवून टाका. तुमचे केस सॅाफ्ट आणि लांब होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.