Bharat Jadhav
वजन कमी करण्याप्रमाणे वजन वाढवणे देखील सोपे नाही.
अनेकांना त्यांचे वजन वाढवण्याची इच्छा असते. पण काही केलं तरी त्यांचं वजन वाढत नाही. एका महिन्यात कशा प्रकारे वजन वाढवता येईल असं, आज आपण जाणून घेऊ.
जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नका. पाणी प्यायल्याने पुरेशा कॅलरी मिळवणे कठीण करू शकते. यामुळे भूक कमी होते.
आपल्या जेवणाच्या आहारात प्रथिने असतील याची काळजी घ्या. बेसनाचे लाडू, पीनट बटर टोस्ट, मेवा, हरभरा आणि गूळ इत्यादी अन्नघटक खावीत.
दररोज एक ग्लास दूध प्या. किंवा एक स्मुदी बनवा त्यात दूध टाका.
यात प्रथिने, कार्ब आणि कॅलरीज भरपूर असतात.
दररोज सुमारे अर्धा तास शारीरिक हालचाल केली पाहिजे. यामुळे भूक वाढते.
वजन कमी करण्यासाठी झोप आवश्यक असते तसेच वजन वाढवण्यासाठी झोपही आवश्यक असते.
हंगामी फळे आणि भाज्यांच्या सेवनावर भर द्यावा लागेल. यामुळे कॅलरी आणि प्रोटीन वाढते.
येथे क्लिक करा