Saam Tv
निरोगी आणि सुंदर केसांसाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे केसांची योग्य काळी घेणं शक्य होत नाही.
केसांची योग्य पद्धतीनी काळजी घेण्यासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणं गरजेचं आहे.
लांबलडक केसांसाठी घरगुती तेल तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी या तेलाचा वापर करा यामुळे केसगळतीची समस्या दूर होईल.
घरगुती तेल तयार करण्यासाठी खोबरेल तेल, कॅस्टर ऑईल आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा लागेल.
सर्व तेल एका काचेच्या टलीमध्ये भरून त्यात मेथीदाणे आणि कढीपत्त्याची पाने मिक्स करा
तयार तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावा. यामुळे केसांमधील केसगळती आणि कोंड्याची समस्या दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.