ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना आपले ओठ सॉफ्ट गुलाबी हवे असतात. यासाठी ते अनेक प्रोडक्ट्स वापरतात. परंतु याचा विशेष परिणाम होत नाही.
जर तुम्हाला तुमचे ओठ गुलाबी आणि सॉफ्ट करायचे असतील तर तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
ओठ गुलाबी आणि सॉफ्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या ओठांना नारळाच्या तेलाने मसाज करू शकता.
तुमच्या ओठांवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर करा.
तुम्ही दररोज ओठांवर बीटचा रस देखील लावू शकता, ज्यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होऊ शकतात.
याशिवाय, तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून ओठांवर लावू शकता.
ओठांवर साखर आणि लिंबूने मसाज केल्याने मृत त्वचेच्या पेशी सहज निघतात.