ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे.
मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे आरोग्य निरोगी रहाते.
पण मधामुळे तुमच्या त्वचेसंबंधीत अनेक समस्या दूर होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?
सकाळी रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतल्यावर शरीराला अनेक फायदे होतात.
1 कपामध्ये 2 चमचे मध घ्यावे त्यामध्ये थोडेसे लिंबू एकत्र करा आणि चेहऱ्यावर 20 मिनिट लावून ठेवा चेहऱ्यावर काळे डाग निघून जातील.
चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी करण्यासाठी मध आणि व्हिटॅमिन E ची कैप्सूल एकत्र करा आणि चेहऱ्यावर 20 मिनिट लावून चेहरा थंड पाण्यानी धुवून घ्या.
तुम्हाला जर कोरड्या त्वचेची समस्या असेल तर मधाचे काही थेंब चेहऱ्यावर क्रीम प्रमाणे लावावे आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.