ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या रोजच्या जेवणात डाळ असतेच. काहीकजण तर रोजच डाळभात खातात. डाळ आरोग्यासाठी खुपच फायदेशीर मानली जाते.
डाळींमध्ये B जीवनसत्त्वे असतात. यामध्ये फोलेट (B9), थायमिन (B1), रिबोफ्लेविन (B2) आणि नियासिन (B3) यांचा समावेश होतो.
तसेच फायबर, लोह आणि खनिजे यांसारखे शरिराला अत्यंत उपयुक्त असणारे प्रथिनेही असतात.
डाळ कुकरमध्ये किंवा टोपात शिजवली जाते. पण ती शिजवताना त्यावर फेस का येतो हे तुम्हाला माहीत आहे का?
डाळींमध्ये सॅपोनिन हे नैसर्गिक तत्त्व असते. ते पाण्यासोबत मिसळ्यावर हा फेस तयार होतो.
सॅपोनिन हे तत्त्व सर्वच प्रकारच्या डाळींमध्ये आढळते. जे वनस्पती आणि शेंगांना संरक्षण देते.
जर डायल व्यवस्थित शिजवलेली नसेल तर ती जड पडते आणि पोटात ढेकर, अपचन यासारख्या समस्या येतात.
तज्ञांनूसार आरोग्याचे धोके कमी करण्यासाठी डाळ शिजवताना त्यावर आलेला फेस काढून टाक. यामुळे डाळीला चांगली चवही येते.