Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू होताच महिला पापड, कुरडया, सांडगे बनवायला सुरूवात करतात. घरच्याघरी विकत्रीसारखे कुरकुरीत पापड बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
उडीदडाळीचे पापड बनवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
उडीदाचे पापड बनवण्यासाटी उडदाची डाळ, पापडखार, मिरी पूड, मीठ, हिंग, तेल हे साहित्य एकत्र करा.
एका मोठ्या परातीमध्ये उडीद पीठ घ्या त्यात मिरी पूड, हिंग मिक्स करा आणि पापड बनवण्यासाठी पीठ चांगले घट्ट मळून घ्या.
मळलेले पीठ एका पाटा-वरवंटा किंवा खलबत्त्यात घेऊन चांगले कुटावे. पीठाला तेल लावून मऊसूत कुटून घ्या.
तयार पिठाचे लांब गोळे तयार करा आणि सुरीने किंवा दोऱ्याने त्याच्या लहान-लहान लाट्या कापा. या लाट्यांना थोडे तेल लावून एका डब्यात बंद करून ठेवा, जेणेकरून त्या सुकणार नाहीत.
एक लाटी घेऊन पोळपाटावर पातळ पापड लाटा. लाटताना पिठाचा वापर न करता तेलाचा वापर करावा, जेणेकरून पापड तळताना तेल खराब होणार नाही. पापड कडेने आणि मधून एकसारखा पातळ असावा.