Siddhi Hande
महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात उन्हाळ्यात पापड बनवले जातात. उडीदाचे पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला माहितीये का?
अनेकदा पापडाच्या लाट्या या कडक होतात. त्यामुळे पापड लाटता येत नाही. तुम्ही ही टीप वापरुन छान पापड बनवू शकतात.
उडीदाचे पीठ, पापडाचा खार, हिंग, काळीमिरी पूड, मीठ, पाणी, तेल
सर्वात आधी तुम्हाला एका परातीत उडीदाचे पीठ घ्यायचे आहे. त्यात पापडाचा खास व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
या पीठात हिंग, काळी मिरीपूड आणि मिठ टाकून मिक्स करा.
यानंतर पीठात थोडे थोडे पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्या. तुम्ही हे पीठ खलबत्त्यात घालून कुटूदेखील शकतात.
पीठाला जास्त जोर लावून मळले किंवा कुटले तर पापड खमंग होतात.
या पीठाचे लहान लहान लाट्या करुन घ्या. या लाट्यांना थोडं तेल लावा.
यानंतर या लाट्या पापडाच्या आकारात लाटून घ्या.
हे लाटलेले पापड कॉटनच्या कापडावर पसरवून दोन दिवस उन्हात चांगले वाळवून घ्या.
पापड तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकतात.