Rohini Gudaghe
उपवासाच्या कचोरीसाठी सारण तयार करावे लागेल.
सारण तयार करण्यासाठी थोडे तेल गरम करा.
त्यात खोबरं, शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ आणि ड्रायफ्रूट घालून परतवा.
पारी तयार करण्यासाठी बटाटे कुस्करून त्यात राजगीरा पीठ आणि मीठ घालून मळून घ्या.
आता वाटी तयार करून त्यात तयार केलेले मिश्रण भरून कचोरी तयार करा.
भरुन तयार झालेल्या कचोऱ्या तेलात तळा.
तुम्ही या कचोऱ्या आप्पेपात्रात तेल घालून फ्राय करू शकतात.