Omkar Sonawane
आज एकदाशी आहे. उपवासाला तुम्ही भगरीचे थालीपीठ खाऊ शकतात.
भगरीचे थालीपीठ हे पौष्टिक असतात. याचसोबत थालीपीठ बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.
भगरीचे पीठ, उकडलेले पीठ, हिरव्या मिरच्या, मीठ, तूप (जिरे, कोथिंबीर जर हवे असेल तर)
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात भगरीचे पीठ टाका.
या मिश्रणात बारीक चिरलेली मिरची, मीठ टाका. यात तूम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरेदेखील टाकू शकतात.
हे मिश्रण तुम्ही पाणी टाकून छान मळून घ्या.
यानंतर प्लास्टिकच्या पेपरवर तूप लावा.यावर पीठाचा गोळा थापून घ्या.
एका बाजूला तवा गरम करायला ठेवा.त्यावर तूप लावा.
यानंतर हे थालीपीठ तव्यावर टाका.
हे थालीपीठ छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.