ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी पीनट बटर स्मूदी बनवण्यासाठी, ब्लेंडरमध्ये चिरलेले केळीचे तुकडे, पीनट बटर, दूध , मध आणि बर्फाचे तुकडे एकत्र करा. सर्व गाेष्टी गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा आणि लगेच प्या.
केळी पीनट बटर स्मूदीमध्ये प्रोटिन आणि फॅट्स असतात ज्यामुळे शरीराला बराच काळ ऊर्जा मिळते.
यात असलेले पोटॅशियम शरीरातील थकवा कमी करते आणि मासंपेशी मजबूत बनवण्याचे काम करते.
हि स्मूदी वजन वाढविणाऱ्यांसाठी पौष्टिक आणि सुरक्षीत मानली जाते.
या स्मूदीमध्ये फायबर भरपूर असल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते.
स्मूदीमध्ये नॅचरल शुगर असते, त्यामुळे ती त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.
व्यायामानंतर ही स्मूदी प्यायल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.