ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गियर लिव्हरवर सतत जड हात ठेवल्याने शिफटिंग विल्स खाली दाबले जातात ज्यामुळे शिफ्टिंग बॉक्स सिंक्रोनायझरवर प्रेशर टाकल्याने गिअर टिथ घासले जाऊन गाडीचे गिअर घसरायला सुरुवात होते. यामुळे तुम्ही तुमचा दुसरा हात स्टेरिंगवर किंवा आम रेषेवर ठेवा.
लॉंग ड्राइव्ह किंवा फुल स्पीड गाडी चालवली असता घरी आल्यावर तुमच्या गाडीचे इंजीन १५ ते ३० सेकंद नंतर बंद करा. त्वरित बंद केल्यास तुमच्या गाडीचा ट चार्जर खराब होऊ शकतो.
जास्तीत जास्त लोक खड्डे किंवा स्पीड ब्रेकर आल्यावर गाडीचा स्पीड कमी करतात आणि ते गेल्यानंतर पुन्हा गाडीचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करतात जे चुकीचे आहे. असं केल्याने गाडीच्या इंजिनला स्पीड पकडण्यास हार्डवर्क करावे लागते ज्यामुळे सिलेंडर हेडस, गिअर बॉक्स आणि क्लच सारख्या गोष्टी डॅमेज होऊ लागतात.
जेव्हा पण उंच ठिकाणावरून गाडी खाली उतरवत असेल तेव्हा त्याला लोवर गिअरवर ठेवा जसे की, फस्ट गिअर आणि सेकंड गिअर असे केल्याने तुमची गाडी कंट्रोलमध्ये राहील. तसेच गरज पडल्य्यास बाकीचे फीचर्स जसे की, ब्रेक, पॉवर स्टीयरिंग यांचा सहजतेने उपयोग करू शकता.
नेहमी तुमच्या गाडीला फस्ट गिअर वरच पीकअप करा कधी ही सेकंड किंवा थर्ड गिअरवर पिकअप करण्याचा प्रयत्न करू नका.
जे ऑटोमॅटिक कार चालवतात ते लोक पार्किंग करण्याच्या वेळेस गाडीला फक्त P मोड वर लावून जातात. P मोड म्हणजे पार्किंग मोड. P मोड वर गाडी ठेवल्याने सगळ प्रेशर ट्रान्समिशन वर येत असतो. ट्रान्समिशन वर पूर्ण प्रेशर आल्याने ती खराब होऊ शकते.
गाडीचा अचानक एक्सिलेटर ब्रेक दाबू नये गाडी जितकी स्मूथ चालवता येईल तितकी स्मूथ चालवा. तसेच समोरील चालणाऱ्या गाडी पासून अंतर ठेवा जेणेकरून ब्रेक चा वापर कमी करता येईल.
जर तुमची गाडी १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर गाडीला सकाळी किंवा थंड दिवसांमध्ये थोड्यावेळासाठी तिला चालू ठेवा. पण जर तुमची गाडी नवीन असेल त्यात नवीन टेक्नॉलॉजी असतील जसे की, फ्युएल इंजेक्टर वगैरे असेल तर तुम्हाला थंडी मध्ये तुमच्या गाडीला चालू करून ठेवण्याची गरज नाही.