Siddhi Hande
येत्या रविवारी आषाढी एकदशी आहे. आषाढी एकादशीला नेहमीची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल.
तुम्ही या आषाढी एकादशीला खास उपवासाचा मेदूवडा बनवू शकतात.
सर्वात आधी भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
यानंतर गॅसवर कढईत पाणी ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात भगर आणि साबुदाणा पावडर टाका.
यानंतर ही पावडर ५-६ मिनिटे छान शिजवून घ्या.
यानंतर एका भांड्यात बटाटा किसून घ्या. त्यात दाण्याचा कूट, मिरची पेस्ट आणि दही टाका.
यानंतर शिजवलेले पीठ टाका. मस्त एकजीव करुन घ्या.
यानंतर हाताला तेल लावून या पीठाचे वडे बनवून घ्या. त्याला मध्ये छेद करा.
यानंतर कढईत तेल टाका. त्यात हे वडे टाकून मस्त तळून घ्या.