Siddhi Hande
नवरात्रीचे उपवास सुरु आहे. या उपवासाला नेहमी नवीन काय करायचा असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो.
तुम्ही घरच्या घरी उपवासाचे कुरकुरीत भजी बनवू शकतात. हे भजी खूप चविष्ट असतात.
उपवासाचे भजी बनवण्यासाठी फक्त बटाटे, भगर पीठ,मीठ, हिरव्या मिरच्या आणि तेल एवढच साहित्य पुरेसं आहे.
सर्वात आधी तुम्हाला बटाटा बारीक किसून घ्यायचा आहे.
त्यात भगरीचे पीठ टाकायचे आगे.
यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांची पेस्ट करुन टाकायची आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाका.
हे सर्व साहित्य हाताने एकदम एकजीव करा.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात या मिश्रणाचे गोळे सोडा. आणि भजी छान तळून घ्या.