Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊ आणि स्वादिष्ट उपमा; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

1 कप रवा, 2 टेबलस्पून तेल किंवा तूप, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून चणा डाळ, 8-10 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 कांदा (बारीक चिरलेला) , 2½ कप गरम पाणी, मीठ चवीनुसार , 2 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस , किसलेला नारळ (ऐच्छिक)

non acidic upma recipe | google

रवा भाजून घ्या

कढई गरम करून त्यात रवा मंद आचेवर 5-6 मिनिटे हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर तो एका ताटात काढून ठेवा.

Upma Recipe | freepik

फोडणी तयार करा

त्याच कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी तडतडू द्या. नंतर उडीद डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.

Upma | pinterest

पाणी घालून उकळी आणा

फोडणीत गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.

Upma Recipe

रवा मिसळा

उकळत्या पाण्यात भाजलेला रवा हळूहळू घालत सतत ढवळा. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजू द्या.

Upma Recipe

चव वाढवा

उपमा तयार झाल्यावर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि आवडत असल्यास किसलेला नारळ घाला. हलक्या हाताने मिसळून गरमागरम सर्व्ह करा.

Rava Upma Recipe

परफेक्ट उपमासाठी टिप्स

रवा आधी भाजल्याने उपमा मोकळा आणि चविष्ट होतो. अधिक पौष्टिकतेसाठी गाजर, मटार, शिमला मिरची किंवा बीन्स घालू शकता. पाणी आणि रव्याचे प्रमाण योग्य ठेवा, म्हणजे उपमा मऊ आणि फुललेला होईल.

Upma Recipe | Yandex

Schwan Noodles Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी बनवा झणझणीत शेझवान नूडल्स; वाचा सोपी रेसिपी

Veg Hakka Noodles Recipe
येथे क्लिक करा