Schwan Noodles Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी बनवा झणझणीत शेझवान नूडल्स; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

200 ग्रॅम नूडल्स 2-3 टेबलस्पून शेझवान सॉस 1 कांदा (उभा चिरलेला) 1 शिमला मिरची (लांब चिरलेली) 1 गाजर (ज्युलियन कट) 1/2 कप कोबी (बारीक चिरलेला) 1 टीस्पून लसूण (बारीक चिरलेला) 1 टीस्पून सोया सॉस 1 टीस्पून व्हिनेगर 1 टीस्पून टोमॅटो केचप (ऐच्छिक) 2 टेबलस्पून तेलमीठ आणि मिरीपूड चवीनुसारस्प्रिंग ऑनियन सजावटीसाठी

Veg Hakka Noodles Recipe

नूडल्स उकळून घ्या

एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा. त्यात थोडे मीठ आणि काही थेंब तेल घालून नूडल्स शिजवा. शिजल्यानंतर थंड पाण्याने धुऊन बाजूला ठेवा.

Schwan Noodles Recipe

भाज्या परतून घ्या

कढईत तेल गरम करून त्यात लसूण परता. नंतर कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घालून मोठ्या आचेवर 2-3 मिनिटे परता. भाज्या किंचित कुरकुरीत राहू द्या.

Schwan Noodles Recipe | Google

सॉस मिसळा

भाज्यांमध्ये शेझवान सॉस, सोया सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो केचप घालून चांगले मिसळा. चवीनुसार मीठ आणि मिरीपूड घाला.

Schwan Noodles Recipe

नूडल्स घालून टॉस करा

उकडलेले नूडल्स कढईत घाला आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने टॉस करा. 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर शिजवा.

Schwan Noodles Recipe | Google

सजावट करून सर्व्ह करा

वरून स्प्रिंग ऑनियन घालून गरमागरम शेझवान नूडल्स सर्व्ह करा. आवडत असल्यास मंचुरियन किंवा चिली पनीरसोबतही खाऊ शकता.

Schwan Noodles Recipe | Social Media

परफेक्ट शेझवान नूडल्ससाठी टिप्स

नूडल्स जास्त शिजवू नका. भाज्या मोठ्या आचेवर परता, त्यामुळे त्या कुरकुरीत राहतात. तिखटपणा आवडीनुसार शेझवान सॉसचे प्रमाण कमी-जास्त करा. अधिक चवसाठी मशरूम, पनीर किंवा चिकनही घालू शकता.

Schwan Noodles Recipe | Saam Tv

Pooja Sawant: जांभळा ड्रेस अन् कानात झुमके...; पूजा सावंतचा एलिगंट लूक व्हायरल

Pooja Sawant | Saam Tv
येथे क्लिक करा