ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सर्वत्र आपल्याला दिवाळी सणाची तयारी पाहायला मिळत आहे.
दिवाळी सण हा आनंद आणि उत्सावाचे प्रतिक आहे.
या दिवसांत घराची साफसफाई करुन आकर्षक अशी सजावट केली जाते.
अशाच नागरिकांसाठी आम्ही सजावटीच्या काही सोप्या टीप्स घेऊन आलो आहोत.
दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो, म्हणून तुम्ही घराच्या सजावटीसाठी हे सुंदर नेट स्ट्रिंग एलईडी लाईट्स खरेदी करुन तुमच्या घराच्या भिंती सजवू शकता.
दिवाळी सजावटीसाठी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये सुंदर असे कंदील सहजपणे लटकवू शकता.
दिवाळीच्या सणामध्ये दारात रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते, म्हणून तुम्ही या दिवसांत रांगोळीच्या नवनवीन डिझाईन वापरु शकता.
दिवाळीसणामध्ये घर दिव्यांनी उजळून टाकण्यासाठी तुम्ही हँडक्राफ्ट फ्लॉवर टी लाइट मेणबत्त्या वापरु शकता.
NEXT: Sprouts खा अन् हेल्दी राहा