ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला ऐकून विचित्र वाटेल पण, काही देशात मृतदेहासोबतही लग्न करण्याची परवानगी आहे.
चीनमध्ये मृत व्यक्तीशी लग्न करण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे. सुमारे ३००० वर्षापासून चीनमध्ये मृतदेहाशी लग्न करण्याची परवानगी आहे.
फ्रान्समध्ये याला 'मरणोत्तर विवाह' म्हणतात. आणि फ्रान्समध्ये कायदेशीररित्या वैध आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करावे लागते.
लग्नासाठी, जिवंत व्यक्तीला हे सिद्ध करावे लागते की मृत व्यक्तीची लग्न करण्याची इच्छा होती.
लग्नासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबाची आणि राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.
या भयानक लग्नात, अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा मृतदेह स्मशानभूमीतून लग्नस्थळी आणला जातो.
तिथे त्यांना वधू-वरांसारखे कपडे घातले जातात.आणि मुलीचा विवाह केला जातो.
हा कायदा पहिल्या महायुद्धानंतर लागू करण्यात आला होता. जेणेकरून युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसोबत त्यांच्या प्रियकरांना औपचारिकपणे लग्न करता येईल.