ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डाएटिंग किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होणे सामान्य नाही. हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
हायपरथायरॉईडीजम असल्यास, शरीर कॅलरीज लवकर बर्न करते आणि वजन कमी होते.
जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल तर हे टाइप-१ मधुमेहामुळे देखील होऊ शकते. यामुळे साखरेची पातळी असामान्यपणे वाढते.
टीबी हे अचानक वजन कमी होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. या रुग्णांना भूक कमी लागते आणि त्यांच्या शरीराचे वजन झपाट्याने कमी होते.
काही कर्करोगाचे पहिले लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे. म्हणून त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
अचानक वजन कमी होणे सेलिआक रोग, अल्सर किंवा क्रोहन डिसीज यासारख्या पचन समस्यांमुळे होऊ शकते.
एचआयव्ही आणि एड्सच्या समस्येमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि वजन वेगाने कमी होऊ लागते.