Surabhi Jayashree Jagdish
जेव्हा इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या काम करत नाही तेव्हा मधुमेह होतो. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
खाण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण, झोप न लागणे, लठ्ठपणा यामुळे मधुमेहाची लागण होऊ शकते.
मधुमेहामुळे हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणं, कमकुवत दृष्टी आणि पायाच्या समस्या उद्भवू शकतात.
वारंवार तहान लागणं, जास्त भूक लागणं, वारंवार लघवी होणं, वजन कमी होणं, जखमा भरण्यास उशीर होणं, अंधुक दृष्टी, शरीरात कमजोरी आणि थकवा ही त्याची लक्षणं असू शकतात.
ब्लड शुगर म्हणजे आपल्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण, जे शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. तर मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीर रक्तातील साखर नियंत्रित करू शकत नाही आणि त्याची पातळी सतत वाढत राहते.
जर रक्तातील साखरेची पातळी 200 mg/dL किंवा त्याहून अधिक असेल तर ते मधुमेहाचं लक्षण असू शकतं.
सकस आणि संतुलित आहार घ्या, व्यायाम करा, जास्त पाणी प्या, तणाव कमी करा या सवयी जोपासल्याने मधुमेहावर नियंत्रण सोपं आहे.