Tanvi Pol
अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे.
या शहराच्या नावामागे एक ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे.
जी थेट मध्ययुगीन काळाशी जोडलेली आहे.
अंबरनाथ या नावाच्या उगमाबाबत विविध कथा शिवाय ऐतिहासिक संदर्भ सांगितले आहेत.
या शहराचे नाव मुख्यतः इथे असलेल्या प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिरावरून पडलेले आहे.
हे मंदिर अंबरनाथच्या मध्यभागी आहे आणि त्याला 'अंबरनाथ शिवमंदिर' म्हणून ओळखलं जातं.
या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंथी असून ते काळ्या दगडातून कोरलेलं आहे.
या ठिकाणी असलेल्या शिवमंदिरामुळे या शहराला 'अंबरनाथ' हे नाव मिळालं.