Dhanshri Shintre
तुम्ही तळलेले उकडीचे मोदक किंवा वाफवलेले उकडीचे मोदक खाल्ले असतील.
मात्र तुम्ही कधी भाजी पद्धतीने उकडीचे मोदक खाल्ले आहेत का? जाणून घ्या त्याची स्पेशल रेसिपी.
तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, तेल, किसलेला नारळ, गूळ, वेलदोडा पूड, कांदा, लसूण पाकळ्या, आले, कोथिंबीर, खोबरे, तिखट, हळद, मोहरी-हिंग-कढीपत्ता.
एका पातेल्यात पाणी गरम करून थोडे मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी पीठ थंड झाल्यावर ते मळून घ्यावे.
सारणासाठी गूळ आणि ओल्या नारळाचे मिश्रण गॅसवर शिजवावे. त्यात वेलदोड्याची पूड मिसळावी.
नंतर उकडीच्या पिठाचे लहान गोळे करून त्याला थोडे तेल लावून हाताने मोदकाचा आकार द्यावा. त्यात सारण भरून सर्व मोदक तयार करावेत.
हे मोदक नंतर १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावेत.
मोदकांची भाजी करताना प्रथम फोडणी करून त्यात चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण आणि आले परतावे.
त्यानंतर हळद व तिखट घालावे आणि तयार वाफवलेले मोदक त्यात घालावेत.
थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे मिश्रण शिजवावे.
शेवटी कोथिंबीर आणि खोबरे घालून गरम गरम भाजी सर्व्ह करा.