Adai Dosa Recipe: नाश्त्याला साधा डोसा खाऊन वैतागलात? मग आजच ट्राय करा अडई डोश्याची खास रेसिपी

Dhanshri Shintre

डोसा

डोसा हा दक्षिण भारतातील अतिशय प्रसिद्ध असा क्रेप प्रकार आहे, जो कुरकुरीत आणि चविष्ट म्हणून ओळखला जातो.

अडई

अडई ही तामिळनाडूतील पारंपरिक डाळींपासून बनवलेली हेल्दी, प्रथिनेयुक्त व पौष्टिक अशी एक स्वादिष्ट क्रेप डिश आहे.

कृती

¾ कप तांदूळ मोठ्या भांड्यात घालून तीनदा धुवा आणि ताज्या पाण्यात ३–४ तास भिजवून ठेवा.

मिरच्या घाला

४ ते ५ लाल मिरच्या स्वच्छ करून देठ काढा आणि त्या भिजवलेल्या तांदळात घालून ठेवा.

डाळी धूवा

चणाडाळ, तूरडाळ, उडीद डाळ, मूगडाळ सर्व डाळी वेगळ्या भांड्यात घालून धुवा आणि ३–४ तास भरपूर पाण्यात भिजत ठेवा. प्रमाण ठेवा योग्य.

वाटून घ्या

तांदूळ, लाल मिरच्या, सोललेले आले, जिरे आणि थोडेसे पाणी ब्लेंडरमध्ये घालून जाडसर आणि खमंग पीठ तयार करा.

डाळ घाला

भिजवलेल्या डाळींचे पाणी गाळा आणि डाळी ब्लेंडरमध्ये टाका. नंतर थोडे पाणी घालून मऊसर बॅटर तयार करा.

कांदा मीठ घाला

आदाईचं पीठ तयार झाल्यावर त्यात कोथिंबीर, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घाला.

पातळ पसरवा

पिठाचे जाडसर किंवा पातळ डोसे पसरण्यास सुरुवात करा आणि वरून तूप किंवा तेल घाला, हवे तसे.

सर्व्ह करा

गरम अडई लसूण, नारळ किंवा कांद्याच्या चटणीसोबत स्वादिष्ट लागते. कोणतीही चटणी त्यासोबत उत्तम जुळून येते.

NEXT: रोज नाश्त्याला पोहे खाऊन वैतागलात? मग कुरकुरीत डोश्याची झटपट रेसिपी नोट करा

येथे क्लिक करा