Dhanshri Shintre
डायटवर असताना कुटुंबासाठी आरोग्यदायी नाश्ता शोधत असाल, तर झटपट तयार होणारा आणि पौष्टिक ओट्स डोसा उत्तम पर्याय ठरू शकतो.
डायटवर असताना कुटुंबासाठी आरोग्यदायी नाश्ता शोधत असाल, तर झटपट तयार होणारा आणि पौष्टिक ओट्स डोसा उत्तम पर्याय ठरू शकतो.
ओट्स, तांदळाचे पीठ, रवा, दही, जिरे, मीठ, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या, पाणी.
ओट्स डोसा तयार करताना प्रथम रेडी टू इट ओट्स बारीक करून घ्या, त्यात रवा आणि तांदळाचे पीठ मिसळा आणि चांगले ढवळा.
मिश्रणात चवीनुसार मीठ, जिरे, चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून शेवटी थोडं दही टाकून नीट मिसळा.
गरम तव्यावर ओट्स डोशाचं मिश्रण पसरवा, दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून तयार झाल्यावर प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा.
ओट्स डोशाचं पीठ पातळ असतं, त्यामुळे ते पसरवण्याची गरज नसते. चमच्याने तव्यावर ओता आणि आपोआप पसरु द्या.
दोन्ही बाजूंनी डोसा छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. त्यानंतर नारळ किंवा शेंगदाणा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.