Leftover Rice Recipe: उरलेल्या भातातून बनवा कुरकुरीत आणि खमंग मेदू वडे, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Dhanshri Shintre

पावसाळी नाश्ता

पावसाळा सुरू झाला की घराघरांत गरमागरम पकोडे, कुरकुरीत कटलेट आणि चविष्ट वड्यांची चव घेण्याची क्रेझ प्रचंड वाढते.

काही वेगळं प्रयत्न

संध्याकाळच्या चहा वेळेस बटाटा आणि कांद्याची भजी अनेकदा बनवली असतील, पण त्यात नवनवीन चव आणण्यासाठी तुम्ही काही वेगळं प्रयत्न केलं आहे का?

कुरकुरीत मेदू वडे

आज आम्ही तुमच्यासोबत उरलेल्या भाताचा वापर करून खमंग आणि कुरकुरीत मेदू वडे बनवण्याची झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर करणार आहोत.

साहित्य

उरलेला भात, दही, रवा, कांदे, हिरव्या मिरच्या, चिलिफ्लेक्स. कोथिंबीर, शिमला मिरची, मीठ, तेल, कढीपत्ता, जिरे.

मिश्रण वाटून घ्या

भाताचे मेदूवडे बनवण्यासाठी साहित्य तितक्याच प्रमाणात वापरा. शिळा भात मिक्सरमध्ये पाणी घालून मऊ पेस्ट तयार करा.

मिश्रण एकत्र करा

भाताच्या पेस्टमध्ये रवा आणि तांदूळ पीठ घाला. त्यात किचन किंग मसाला, मीठ, जीरे, ओवा, कोथिंबीर, मिरची आणि मीठ मिक्स करा.

पीठ मळा

पीठाची चव चाखून तिखट आणि मीठ आवश्यकतेनुसार घाला. थोडे तेल टाकून पीठ १५ मिनिटं मुरू द्या, ज्यामुळे चव छान येते.

छोटे गोळे बनवा

कढईत तेल गरम ठेवा. प्लास्टिक कागदावर तेल लावून, हाताला तेल लावत छोटे गोळे बनवा आणि त्यामध्ये मधोमध भोक करा.

कुरकुरीत होईपर्यंत तळा

गरम तेलात वडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

सर्व्ह करा

गरमागरम कुरकुरीत भाताचे वडे ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवा, सोबत केचप किंवा आवडती चटणी देऊन प्लेटमध्ये सर्व्ह करा.

NEXT: मेदू वड्यांपेक्षा चवदार, कुरकुरीत रवा वडे घरच्या घरी तयार करण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी

येथे क्लिक करा