Shreya Maskar
'उकाळा' बनवण्यासाठी दूध, पाणी, गुलाबाच्या पाकळ्या, हळद, बडीशेप, लवंग, काळी मिरी,चक्रफुल, वेलची, जायफळ, चारोळी, सुंठ पावडर आणि गुळ पावडर इत्यादी साहित्य लागते.
'उकाळा' बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी, दूध, हळद छान उकळवून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, लवंग, काळी मिरी, चक्रफुल , वेलची आणि जायफळ वाटून त्याची पावडर बनवा.
आता उकाळ्यामध्ये तयार मसाला टाकून छान मिक्स करा.
त्यानंतर यात चारोळी, वेलची, आणि सुंठ पावडर घाला.
गोडव्यासाठी तुम्ही यात गूळ टाकू शकता.
दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
उकाळा एका ग्लासत ओतून त्यात गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका.