Shruti Vilas Kadam
पैठणीच्या पदरावर आणि बुट्ट्यांमध्ये मोराची आकर्षक नक्षी हे सर्वात लोकप्रिय डिझाइन आहे. पारंपरिक आणि रॉयल लूकसाठी हा प्रकार खास पसंत केला जातो.
मुनीया डिझाइनमध्ये पदराच्या काठावर पोपटासारखी नक्षी दिसते. या पारंपरिक डिझाइनमुळे साडीला सुंदर आणि उठावदार लूक मिळतो.
कमळाच्या फुलांची नक्षी असलेली पैठणी अतिशय नाजूक आणि आकर्षक दिसते. पारंपरिक लूकसोबत एलिगंट स्टाइल हवी असल्यास हा प्रकार निवडता येतो.
आसावली डिझाइनमध्ये फुलं, पाने आणि वेलबुट्टीची नक्षी दिसते. संपूर्ण साडीवर किंवा पदरावर केलेली ही नाजूक कलाकुसर पैठणीला खास बनवते.
काठावर ठळक आणि आकर्षक नक्षीकाम असलेली पैठणी म्हणजे कड पैठणी. पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसाठी हा प्रकार विशेष लोकप्रिय आहे.
नारळाच्या आकारासारखी नक्षी असलेला काठ हे या पैठणीचे वैशिष्ट्य आहे. साधेपणात पारंपरिक सौंदर्य हवे असल्यास हा प्रकार सुंदर पर्याय ठरतो.
बांगडीसारख्या गोलाकार नक्षीमध्ये मोराची कलाकुसर केलेली असते. पदरावर दिसणारे हे डिझाइन पैठणीला अतिशय रॉयल आणि आकर्षक लूक देते.