Shruti Vilas Kadam
कतान सिल्क बनारसी साडी तिच्या नाजूक विणकामासाठी आणि सुंदर टेक्सचरसाठी ओळखली जाते. लग्नसमारंभ आणि खास प्रसंगांसाठी ही साडी आकर्षक पर्याय ठरते.
जंगला बनारसी साडीवर फुलं, पाने आणि वेलींंचे सुंदर डिझाइन विणलेले असते. संपूर्ण साडीवर पसरलेली नक्षी तिला रॉयल लूक देते.
तनचोई साडीमध्ये रंगीत धाग्यांचा वापर करून आकर्षक पॅटर्न तयार केले जातात. तिचे बारकाईने केलेले विणकाम आणि समृद्ध डिझाइन विशेष लक्ष वेधून घेतात.
ऑर्गेन्झा बनारसी साडी हलकी आणि नाजूक असते. तिच्यावर सुंदर जरी किंवा बुट्ट्यांचे काम केलेले असते. सण-समारंभासाठी ही साडी स्टायलिश दिसते.
या प्रकारच्या साडीवर संपूर्ण कापडावर छोटे-छोटे बुट्टे विणलेले असतात. साधेपणासोबत पारंपरिक लूक हवा असेल तर बुटीदार बनारसी साडी उत्तम पर्याय आहे.
कटवर्क बनारसी साडीमध्ये अतिरिक्त धागे कापून सुंदर नक्षी तयार केली जाते. पारंपरिक विणकाम आणि आकर्षक डिझाइनमुळे ही साडी लग्नासाठी खास ठरते.
ब्रोकेड बनारसी साडीमध्ये समृद्ध जरीचे आणि उठावदार विणकाम दिसते. तिचा भव्य लूक विशेषतः लग्न, रिसेप्शन आणि सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरतो.