Chetan Bodke
प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचं कॅन्सरमुळे निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. पण आज डॉलीची वयाच्या ४८ व्या वर्षी कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली आहे.
२०२३ मध्ये डॉलीला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान झाले होते, याबद्दलचा खुलासा तिने जानेवारी २०२४ मध्ये केला होता.
कॅन्सरचे निदान झाल्यामुळे अभिनेत्रीला 'झनक' मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घ्यावा लागला होता.
डॉलीने आपल्या २० वर्षांच्या करियरमध्ये २० हून अनेक टीव्ही सीरियलमध्ये तिने काम केले होते.
डॉली कायमच इन्स्टाग्राम सक्रिय राहायची, अनेकदा तिने इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले.
'भाभी', 'कलश', 'मेरी आशिकी तुम से ही', 'खूब लडी मर्दानी' आणि 'झांसी की रानी' सारख्या मालिकेंतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
डॉलीच्या निधनाचे वृत्त कळताच, सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी तिला पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.